मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. आपले आणि कुटुंबीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपणही लवकरात लवकर लस घ्यावी ही विनंती, असं रामदास कदम म्हणाले होते.
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुवणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे, अशी विनंती त्यांनी केली होती.
लसीकरणानंतरही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुवणे या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करावे. 2/2
— Ramdas Kadam – रामदास कदम (@iramdaskadam) March 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”
‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
“राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”
“…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल”