Home महाराष्ट्र एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?; क्रांती रेडकरचं थेट मुख्यमंत्र्यांना...

एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?; क्रांती रेडकरचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर जोरदार टीका केली होती.

‘अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावरुन वानखेडे यांच्या पत्नी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

‘लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?, असा सवाल क्रांती रेडकर यांनी केला.

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसेच्या तसं

‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे..

‘सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत.. मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.’

‘आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.’

आपली बहिण
क्रांती रेडकर

महत्वाच्या घडामोडी – 

“राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्राला टोला