अर्जेंटिना : अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅराडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
1986 साली आपल्या खेळीने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. हँड ऑफ गॉड अशी मॅराडोना यांची ओळख होती.
दरम्यान, मॅराडोना यांनी अर्जेंटिना संघाकडून 91 सामन्यांमध्ये 34 गोल करत मोलाचं सहकार्य केलं होतं. तर अखंड फुटबॉल कारकिर्दीमध्ये त्यांनी 259 गोल केले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस
संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल- रामदास आठवले
“भाजपचा उमेदवार पराभूत करणे म्हणजे माझे नाक कापले जाईल असं विरोधकांना वाटतं”
सोनाक्षी सिन्हा मालदीवच्या बीचवर; हाॅट अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड