मुंबई : शिवसेनेचे कट्टर समर्थक उपनेते आणि कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक यांचं चेबूर घाटला येथे काल रात्री 8.30 वाजता दीर्घ आजारानं निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
सूर्यंकांत महाडिक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी विविध कामगार यूनियनचं नेतृत्व केले. सूर्यकांत महाडिक हे जवळपास 5 हजार कामगार यूनियनचा कारभार पाहत असत.
दरम्यान, कामगारांचे प्रश्न मांडणाऱ्या सूर्यकांत महाडिक यांच्या रुपानं शिवसेनेला नेहरुनगर विधानसभा मतदारसंघात पहिला आमदार मिळाला. 1990 सूर्यकांत महाडिक नेहरूनगरमधून विजयी झाले. त्यांनी दोनवेळा नेहरुनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.
महत्वाच्या घडामोडी-
“भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण”
“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”
मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात?; बलात्काराच्या घटनांवरुन चित्रा वाघ कडाडल्या
एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि…; सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका