मुंबई : भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.
2019 च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आल्याचा दावा देखील मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.
महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात, असं मंदा म्हात्रे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला
…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा
पंकजाताई, 2024 च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत- करूणा मुंडे
चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले