नवी दिल्ली : अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत. यावर अभिनेत्री कंगणा रणाैत हिनं फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
कंगणाने व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये, हे चित्र आहे आजचं अफगाणिस्तानमधील राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान घरातील. फार वर्षांपूर्वी भारतमाता या भटक्या आणि रानटी मुस्लिमांच्या कचाट्यात कशी सापडली असेल, असं कंगणानं म्हटलं. तसेच पाकिस्तान देश तालिबान्यांचं पालनपोषण करतो तर अमेरिका त्यांना शस्त्रं पुरवतो., असंही कंगणा म्हणाली.
आज आपण शांतपणे पाहत आहोत, उद्या हे आपल्यासोबतही घडू शकतं. भारत सरकार अफगाणिस्तानमधील भारताच्या लोकांनी परत आणत आहे. चांगलं झाल मी सीएए कायद्याला पाठींबा दिला, असंही कंगणानं यावेळी म्हटलं. तसेच जर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर भारताचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानासारखीच झाली असती, असं कंगणा रणाैतनं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी शरद पवार यांनी…; चंद्रकांत पाटलांची टीका
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आक्रमक महिला नेत्या लवकरच भाजपात!
सात कशाला, हीच पिढी शिवसेनेला संपवेल; निलेश राणेंचं प्रत्युत्तर
जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना अजित पवार भावूक