मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडले आणि, त्याहीपेक्षा नाट्यमय घटना म्हणजे ते पिस्तूल शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला.
करूणा शर्मांवर अॅट्राॅसिटीचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. यातच जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्व प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
अॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिला नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणं आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता”
पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस
राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हांला नाही; रूपाली चाकणकरांचा टोला