कोण काम करतंय हे समजूतदार लोकांना माहिती आहे; शिवसेनेचं अमित ठाकरेंना प्रत्युत्तर

0
703

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील 25 वर्षांपासून सत्तेत राहूनही कुठलेही काम केले नाही. हे लोक जो पर्यंत सत्तेत राहतील तो पर्यंत लोकांचे हाल होतच राहतील, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर केली होती. त्याला युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नविन पूल, रस्ते यांच्यासह महत्वाच्या विकासकामांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरती कोण काम करत आहे याबाबत लोकं समजूतदार आहेत, असं वरुन सरदेसाई म्हणाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वरुण देसाई कल्याणात आले होते.

दरम्यान, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कल्याण डोंबिवलीत दौरा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

…तर देवेंद्र फडणवीसांना शाबासकी मिळेल; नाना पटोलेंचा टोला

राष्ट्रवादी ‘त्या’ जागेवर महिलांना देणार संधी?; पक्षाच्या गोटात चर्चा रंगल्या

एकनाथ खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले कसे?; गिरीश महाजन यांचा सवाल

शरद पवारांवर असलेल्या प्रेमापोटी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here