“महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा. असं आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. ते लातूर मध्ये कार्यक्रमात बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार जबरदस्त कामगिरी करत आहे. यांचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय माध्यम व न्यायालयाने केलेल्या कौतुकातून समोर आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा वेग दुपटीने करण्यासाठी अशाच आशीर्वाद असू द्या. तसेच नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : मी तुम्हाला पद देऊ शकतो, तसं तुमचं पदही काढून घेऊ शकतो, त्यामुळे…; राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं

दरम्यान, मराठवाडा संपर्क नेते तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे दोन दिवस लातूर-बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व संघटनात्मक बांधणी याबाबत ११ ठिकाणी बैठका होणार असून या बैठकांमध्ये महाविकास आघाडी, जागा वाटप तसेच अनेक स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येईल.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचा नुकसान केलंय; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

 रोहित आणि हार्दिक यांच्यासोबत धनंजय मुंडेंचीही तुफान बॅटिंग, म्हणाले…

 ‘…नाही तर गुन्हा दाखल करू’; शिवसेनेचा भाजप आमदाराला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here