मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा केली. लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे. मात्र यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
आंदोलन, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन! आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन हेही सांगा, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
आंदोलन,याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरण आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्ट ला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“देशाला 2014 पासून ग्रहण लागलंय, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक आज सत्तेत आहेत”
लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत
“ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाही, त्यामुळे…”
काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा