आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उदयनराजे भोसले यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. याभेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.
उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली”, असं ते म्हणाले.
हे ही वाचा : औरंगाबादेत भाजपचे 5 हजार नेते शिवसेनेत प्रवेश करणार; अब्दुल सत्तार यांचा दावा
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
‘…म्हणून मला बाजूला करण्यात आलं’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर म्हणतात…
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची राहत्या घरात घुसून हत्या