आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सूरू आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच आता गडकरींनंतर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे.
या भेटीचं नेमकं कारण काय आणि राज ठाकरेंसोबत काय चर्चा झाली, याबद्दल रावसाहेब दानवे यांनी माहिती दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वाचा : पवार साहेब ही काळाची गरज, ते जर आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच असतं- यशोमती ठाकूर
मुंबईत रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. यानंतर मी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत या झोपडपट्ट्या हटवू नये, असं म्हटलंय. तर, या झोपड्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच प्रमाणे मी राज ठाकरेंची भेट घेतली, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
2024 मध्ये कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार- रामदास आठवले