Home अमरावती राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

राज्यात आता लवकरच नवी युती होणार?; नाना पटोलेंच्या विधानाने खळबळ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलडाणा : कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच राज्यात पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे, मात्र ‘त्यांच्याकडून कुठल्याही चर्चेसाठी निमंत्रण नाही, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजून युती संदर्भात वंचितकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. वंचितकडून प्रस्ताव आल्यास त्यावर नक्कीच विचार करू, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी यावेळी माध्यमांना बोलताना दिली.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नेते फुटलेत; फक्त पक्षप्रवेशाचा मूहूर्त बाकी; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

वंचित आघाडीकडून असा कुठलाच प्रस्ताव सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा माझ्याकडे आलेला नाही, असा खुलासाही नाना पटोलेंनी यावेळी केला. तसेच ‘प्रकाश आंबेडकर हे भाषणात फक्त सांगत आहेत, मात्र आमच्याकडे कुठलाच प्रस्ताव युती संदर्भात आलेला नाही, प्रस्ताव पाठवल्याचे प्रकाश आंबेडकर का सांगत आहेत?, असा सवालही नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारांच्या भेटीला; उद्धव ठाकरेही मातोश्रीवरून रवाना; ठाकरे-शिंदे भेट होणार?”

महिला पत्रकाराबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना, अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

शिंदे गटातील ‘हा’ नेता आमच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा मोठा गाैफ्यस्फोट