मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव शाळा, महाविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा आणि पावसाळ्यातील पुर्व तयारीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिकमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. शिवाय आता लॉकडाउनचा पाचवा टप्पा आणखी शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे आर्थिक चक्र वेगानं फिरेल. त्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to hold a meeting with State Cabinet through video conferencing today. (file pic) pic.twitter.com/H0Tpn0YM0S
— ANI (@ANI) June 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाला धोका दिला- राजनाथ सिंग
“कोरोना संसर्गाबाबत चीनचा मोठा खुलासा”
महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे; राजनाथ सिंग यांची राज्य सरकारवर टीका
लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं राज्य सरकारकडे कसलंच नियोजन आणि धोरण नाही- राजू पाटील