आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
हे ही वाचा : शिवेंद्रराजे भोसलेंमुळंच माझा पराभव झाला; आमदार शशिकांत शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट
ठाकरे सरकारनं पगारवाढ जाहीर करूनही एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. यानंतर आता सरकार आणि कर्मचारी यांच्यात चर्चा सूरू झाली आहे. तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावर चर्चा होत आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतर विलीनीकरणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाने आमच्यासोबत मिळून राज्य करावे; संजय राऊतांची भाजपाला खुली ऑफर
संप बेकायदेशीर ठरविल्यास एका दिवसाला 8 दिवसांचा पगार कापणार- अनिल परब
राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार; नाना पटोले म्हणतात..