मुंबई : नागपुरात लाॅकडाउनमध्ये घरगुती विजेचे बील चक्क 40 हजार रूपये आलेल्या व्यक्तीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या बातमीला ट्विटरवर कोट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला सवाल केले आहेत.
सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..!
वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही.
आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही.
लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले.
सरकार आता तरी जागे होईल का?#ElectricityBill https://t.co/FVm5CMcHO0— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव
अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर पार्थ पवारांनी दिल्या पत्राद्वारे शुभेच्छा; म्हणाले…
कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारत नाही; निलेश राणेंचा पलटवार