आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ओबीसी आरक्षणाचा विषय हाताळताना अध्यादेश काढण्यात येईल असं महाविकास आघाडी सरकारचे ठरलं आहे. त्यामुळे ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणता येईल. अध्यादेश काढून काही अंशी न्याय मिळेल पण कायम स्वरूपी उपाय करण्यासाठी आणखी खंबीर पावलं उचलावी लागतील ती ही वेळेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का? आता लागलेल्या निवडणुकीत लागु होईल का? ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे ही काळाची गरज आहे, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का? आता लागलेल्या निवडणुकीत लागु होईल का ??.. obc चे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे ही काळाची गरज आहे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाला आंदोलनाची नौटंकी करून पाप झाकता येणार नाही; ओबीसी अरक्षणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल
मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?; चित्रा वाघ यांचा सवाल
आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका
माफी मागा, अन्यथा…; सुरेखा पुणेकरांचा प्रविण दरेकरांना इशारा