मुंबई : पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? असा सवाल करत भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत या सरकारने दिले आहेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारने याचा विसर पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण”
आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंची शिवसेनेवर टीका
भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं प्रदीर्घ आजारानं निधन
विराट-अनुष्का तुम्ही उत्तम पालक व्हाल; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक