ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार का?; पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं माैन, म्हणाल्या…

0
379

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नसल्याचं म्हटलं आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी एक मोठं विधान केलं होतं.

पंकजा मुंडेच्या नाराजीबद्दल बोलताना, पंकजा मुंडे यांचं शिवसेनेत स्वागत आहे, असं सुनील शिंदे यांनी म्हटलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात, तिथे पंकजा मुंडे नसतात, अशा चर्चांनीही उधाण आलं होतं. यावर आता पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी माैन सोडलं आहे.

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पंकजा मुंडे ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : “शिंदेंचा आता मनसेला दणका; ठाकरे गटानंतर आता मनसेच्या ‘या’ नेत्यानं केला शिंदे गटात प्रवेश”

ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता, पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

नाॅट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील आज विभागीय कार्यालयात दाखल, म्हणाल्या…

“नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार”

नारायण राणेंवर टीका करताना, खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here