आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे 55 नगरसेवक निवडून आले, तरी पिंपरी-चिंचवडला शिवसेनेचा महापौर होईल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सव्वा महिन्यापूर्वी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनीही पिंपरीचा महापौर राजसाहेब ठरवतील, असा निर्धार पक्षाच्या मेळाव्यात केला.
सध्या आपला ‘स्वबळाचा’ नारा आहे. पालिका निवडणुकीसाठी युती की आघाडी याचा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. पक्षातील लढण्याची आणि जिंकण्याची ताकद असणाऱ्यांनी गुलालाचा ट्रक घेऊन आजच जावे; कारण राज ठाकरेंचे विचार पटणारा कार्यकर्ता नक्कीच नगरसेवक होणार यात कुठलीही शंका नाही, असं गणेश सातपुते म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्रबाबू वागस्कर, रणजित शिरोळे, मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले आदी व्यासपीठावर, तर रूपेश पटेकर, मयूर चिंचवडे, राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरसे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, हेमंत डागे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज”
माझ्या कंपन्या जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?; अजित पवार संतापले
“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”
लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील