आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढतील अशी चिन्हं दिसत आहेत. मात्र काँग्रेच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेबाबत स्वबळाचा नारा दिला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “मी, तुम्हांला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, महाविकास आघाडीची एकजूट कायम राहणार”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आम्ही आधीच सांगितलं आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा नगरपालिकेची, जिथे जिथे जशी परिस्थिती असेल, तिथल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंबद्दल, बोलताना राज ठाकरे भावूक, म्हणाले, आमच्या नात्यात कोणीतरी…
‘या’ कारणामुळे वर्ध्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिनसलं
अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत; राज ठाकरेंचा टोला