Home महाराष्ट्र आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात…

आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित अशी पहिली मोठी जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगर होणार. या सभेसाठी तीनही पक्षांचे लाखो कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीकडून या सभेला ‘वज्रमूठ’ असं नाव देण्यात आलं आहे. पण मविआची हीच वज्रमूठ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या काळात जशीच्या तशी दिसेल का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : संजय राऊतांवर टीका करताना, शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली, म्हणाले…

महाविकास आघाडी पुढच्या काळात राहील का? हे प्रश्न आता अनावश्यक आहेत. कारण आम्ही एकत्रित येवून लोकांसमोर जातोय. या आमच्या कार्यक्रमानंतर आणि महाराष्ट्रात प्रत्येक विभागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांनंतर मला खात्री आहे की, भाजपचा धीर खचल्याशिवाय राहणार नाही” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विसरलात; शिंदे गटाचा हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”

मार्क वूडपुढे दिल्लीचे लोटांगण; लखनाैचा दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत विजय