मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र तरीही रूग्णसंख्या ही जास्त असल्यानं राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागेल का? अशा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. आता यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण केलं आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेंव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल., असं आदित्य ठाकरे म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, यातही नागरिकांच्या आरोग्यालाच पहिलं प्राधान्य असेल व त्यानुसार पुढचा निर्णय होईल’, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणं हेच मोदी सरकारचे धोरण- राहुल गांधी
भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; टूलकिटवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार
आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे- प्रवीण दरेकर
“ए.बी.डिव्हीलियर्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेनं केला मोठा खुलासा”