Home महाराष्ट्र ‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  आज मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबियांवर केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी थेट मलिक यांना आव्हान दिलं आहे. समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांना उत्तर दिलंय.

आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले. मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो. तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं समीर वानखेडे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीये; औरंगाबाद महिला बलात्कार घटनेवरून चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

दरम्यान, ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो. मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्ज विरोधात काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कामा नये- निलेश राणे

रूपाली चाकणकरांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवर मनसेच्या ‘या’ महिला नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता ‘या’ महिला भाजप आमदार म्हणतात…