आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात भाष्य करताना, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे.
ज्यादिवशी ठाकरे गटाचं सरकार येईल, त्यादिवशी सर्व भ्रष्टाचारांचा हिशोब होईल. आमचं सरकार ज्यादिवशी येईल, त्यादिवशी सर्वांना अटक करु, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
ही बातमी पण वाचा : बुलढाणा खाजगी बस अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, दिवसेंदिवस समृद्धी महामार्गावर…
“मी आजही सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचं सरकार येईल, ते येणार म्हणजे येणार आहे, त्या दिवशी पहिलं काम हेच असणार मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्यांचा घोटाळा भयानक आहे”, असा इशारा आदित्य ठाकरेंनी यावेळी दिला.
दरम्यान, पहिला घोटाळा हा रस्त्यांचा घोटाळा आहे. मी इथे यायला निघालो तेव्हा मला विचारलं होतं की, तुम्ही निवेदन देणार का? मी म्हटलं, चोरांना काय निवेदन देणार? मी फाईल बनवली आहे. ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्यादिवशी आम्ही आणि पोलीस आत येणार आणि तुम्हाला अटक करणार”, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
मी बीआरएसची ऑफर माध्यमातून पाहिली, पण…; बीआरएसच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
खोटं बोला पण रेटून बोला हे फडणवीसांचं धोरण; राष्ट्रवादीची टीका