मुंबई : राज्यात भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात कोण कुणासोबत जातं त्यावरुन मी माझी निष्ठा बदलणार नाही. राजकारणात मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खुप काही शिकायला मिळायला. त्यामुळे शिवसेनेने कुणाशी युती केली, कुणासोबत युती नाही केली, याच्याशी आमचा काही संबंध नाही. बाळासाहेबांचं स्थान कालही, आजही आणि उद्याही हृदयात राहील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही मी काम केलं आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांची चांगले संबंध आहे. माझे राज्यातील विविध पक्षातील अनेक नेत्यांची चांगले संबंध आहे. मी राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे ठेवतो. उद्धव ठाकरेंसोबत माझं नेहमी बोलणं होतं. मात्र राज्यातील राजकारणात आणि पक्षात माझी सध्या काही भूमिका नाही, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण त्यांना नवरीच मिळेना-प्रकाश आंबेडकर
स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
कोरोना रूग्णांच्या मदतीला धावणाऱ्या मनसेच्या ‘या’ नेत्याला 2 वर्षे तडीपारची शिक्षा