आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून अनेकदा महाविकास आघाडीवर सातत्यानं टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता अमृता फडणवीस राजकारणात येणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
हे ही वाचा : “मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार, मात्र एसटी कर्मचाऱ्याला केवळ 12 हजार पगार हे चुकीचंच”
राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही हे मी बोललेला जपून ठेवा, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, त्यांच्या आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यसभेत गोंधळ; शिवसेनेचे 2 तर काँग्रेसचे 6 खासदारन निलंबित
“दक्षिण आफ्रिकेतून किती प्रवासी मुंबईत आले?; आदित्य ठाकरेंनी आकडा सांगितल्यावर प्रशासन हादरलं”
आम्ही पाडणार नाही, महाविकास आघाडी सरकार आपल्या अंतर्विरोधानेच पडेल- देवेंद्र फडणवीस