आज मृत्यूच्या चर्चेपूर्वीच Wikipedia एडिट; काल ‘SirOlgen’ युजरने अजित पवारांची माहिती बदलली, सोशल मीडियावर तर्कवितर्क

0
194

मुंबई :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या Wikipedia पेजवरील एडिटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या पेजवर दिसणाऱ्या पिवळ्या नोटीसनुसार, संबंधित मजकूर 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:22 वाजता ‘SirOlgen’ या युजरने एडिट केला असल्याची नोंद आहे.

Wikipedia ने स्पष्ट केले आहे की हा मजकूर “old revision” म्हणजेच जुनी आवृत्ती असून, तो सध्याचा (latest) अपडेट नसू शकतो. मात्र, या एडिटची वेळ आणि त्यानंतर निर्माण झालेली चर्चा पाहता, सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, या एडिटचा आणि अजित पवार यांच्याबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांचा कोणताही अधिकृत संबंध सिद्ध झालेला नाही. तरीसुद्धा, एकाच दिवसाआधी झालेल्या या एडिटमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, Wikipedia वरील माहिती किती काळजीपूर्वक वापरावी लागते, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here