शिवसेना व राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात येण्यास तयार; करूणा मुंडेंचा खळबळजनक दावा

0
716

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी आता एका नव्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘शिवशक्ती सेना’ हे त्यांच्या पक्षाचं नाव असून त्यांनी एक घोषणा केली आहे.

माझ्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. पक्ष नोंदणी झाली नाही तर मी अपक्ष पॅनेल तयार करून आगामी निवडणुका लढणार आहे, अशी घोषणा करुणा मुंडे यांनी यावेळी केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी एक खळबळजनक दावाही केला.

राज्यातील 2 मंत्र्यांच्या पत्नी माझ्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. यातील एक मंत्री शिवसेनेचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, असा खळबळजनक दावा करूणा मुंडे यांनी यावेळी केला. तसेच मा त्या अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे ही वाचा : “पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झालेत, म्हणूनच तर त्यांना गावगुंड व पंतप्रधानांमधला फरक कळत नाहीये”

दरम्यान, राज्यभर माझे दौरे सुरू आहेत. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांप्रमाणे माझी मोहीम भ्रष्टाचार व घराणेशाही संपविण्यासाठी आहे. मला महाराष्ट्र भयमुक्त करायचा आहे. मी घरातून बाहेर पडल्यामुळे अनेक महिलांना हिंमत मिळू लागली आहे. माझ्या मोहिमेमुळे राज्यातील दोन मंत्र्यांच्या पत्नींचे हृदयपरिवर्तन झाले. त्या माझ्या पक्षात येण्यास तयार झाल्यात हे महिला सशक्तीकरणाचे मोठं काम आहे, असंही करूणा मुंडेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘…तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी’; संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक

“मिरच्या झोंबल्या, बांबू लागला, म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?”

“रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here