Home नाशिक “‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली तेव्हा साहित्यिक गप्प का?”

“‘ती’ बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली तेव्हा साहित्यिक गप्प का?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिक येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव”

स्वातंत्र्य चळवळीतही लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखनातून स्वातंत्र्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित केली, हे आपण विसरू शकत नाही. महात्मा गांधींनीही आपल्या लेखनातून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. हेही आपल्याला विसरता येणार नाही. असं सांगतानाच खरं तर लेखनामध्ये एवढी ताकद असते की, पूर्णपणे इतिहास बदलू शकतो. स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास कोणीही पुसून टाकू शकत नाही. परंतु कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य म्हणजे मिळालेली भीक म्हणते. त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील एक बुजुर्ग उठतो आणि तिला पाठिंबा  देतो, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

कदाचित तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काही आक्षेप असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल असेल, परंतु स्वातंत्र्य चळवळीबद्दल पूर्ण आक्षेप घेणे आणि त्याला भीक म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. यावर एकही साहित्यिक काहीच बोलला नाही, याचेच वाईट वाटते, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी खंत व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या; ‘या’ नेत्याची मागणी

मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दिली ऑफर; ‘या’ नेत्यानं केला गाैफ्यस्फोट

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रोज फोन करतो, पण ते माझा फोन उचलत नाहीत- नारायण राणे