आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिन पार पडलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठा दावा केलाय. तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ती वातावरणात दिसेना. आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, खंद्या समर्थकानं घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”
दरम्यान, मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
पुण्यात होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा; मनसेची जोरदार तयारी सुरू
“केंद्रीय एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा, पण महाराष्ट्र यांच्यापुढे झुकणार नाही, थांबणार नाही”