सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढीव वीज बिलासंदर्भात भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मला जर विचाराल तर सांगेन सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. तेच बाहेर फिरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरतच नाहीत. म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना तसं सांगितलं असावं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं अशी लोकभावना झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच मी फक्त खुर्चीत बसतो. सत्ता चालवण्याचं कंत्राट तुम्हाला घ्या, असा करार ठाकरे-पवारांमध्ये झाला असावा, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन”
कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
जेवलीस का? मॅचदरम्यान विराट कोहलीचा अनुष्काला प्रश्न; सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत माफीनामा; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला