मुंबई : करोनाचा वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले. हे निर्बंध पुन्हा 15 दिवसांसाठी वाढविण्यात आले आहेत. वाढविलेले निर्बंध घोषित करताना केलेल्या घोषणा यावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी सांगा जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा?,” असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये, असंही केशव उपाध्ये म्हणाले.
संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहिये.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”
“खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचं सोंग पाकिस्ताननं का करावं?”
तू कोट्यवधींची मालकीण आहेस तर देशसेवेसाठी खर्च कर; राखी सावंतचा कंगणाला सल्ला