पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण या लसीचे दर जे ठरवण्यात आले आहेत त्यावरून टीका होत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सवाल केला आहे.
लसींबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसींचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी?, सगळ्यांना 150 रुपयात लस द्या?, 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, सरकारनं खरं तर मोफत लस देणं गरजेचं आहे. त्या दराबाबत, लसींच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा लाॅकडाऊन”
“…त्यामुळे महाविकास आघाडीतील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये”
“संकटाला संधी मानून महाविकास आघाडी कधीच राजकारण करत नाही”
“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळच आली नसती”