आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त का?; संजय राऊतांचा सवाल

0
475

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी आणि BARC च्या माजी CEO च्या कथीत चॅट प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आज भाजप का गप्प आहे? राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच अर्णब गोस्वामी कुठे आहेत हे भाजपला माहीत असेल. कारण देश त्यांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलीस योग्य वेळी तपास करतीलच. पण ते कुठे आहेत, काय करीत आहेत याची माहिती भाजपला असावी, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.

दरम्यान, देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषय आहे. देशात आम्ही सत्तेत असतो आणि भाजप विरोधी पक्षात तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत तांडव केलं असतं. प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे काढले असते, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

साहेबांनी मोठे युद्ध जिंकलं; निलेश राणेंची धनंजय मुंडेंवर टीका

“ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांना आता उत्तर मिळालं असेल”

“एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here