Home महाराष्ट्र माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का?- संजय राऊत

माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का?- संजय राऊत

मुंबई : एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी दोन्हीं राजेंवर टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. परंतु, माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन केलं होतं. मग तेच संभाजी भिडे आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे आता मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फडणवीसजी, आपण चुकून PM ऐवजी CM म्हणालात; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे

“केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन”

“सनरायर्झर्स हैदराबादचा किंग्स इलेव्हन पंजाबवर धमाकेदार विजय”