मुंबई : देशात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं, असं म्हणत काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?, असा सवालही रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं…. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते.
पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ!!
” सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?? https://t.co/27VYoKIpMj— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत, फडणवीसांनी ते दिले, तेही सरकारला टिकवता आले नाही”
आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव- सचिन सावंत