मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे, यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांची जी मागणी होती. हिंदुत्व प्रेमी जनतेची मागणी होती. किंबहुना मंदिरावर असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी होती. त्यांचा रेटा दबावाने या ठिकाणी शासनाला निर्णय घ्याव लागला, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
खरंतर हा निर्णय अगोदरच व्हायल हवा होता. कारण, जर मंडई, लॉन्स, अगदी रेस्टॉरंट-बार, जिम व इतर सार्वजिनक गर्दीची स्थळं मोकळी केलेली असतील. तर वारकरी संप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने ही भूमिका मांडलेली असताना मला वाटतं हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वारकरी संप्रदायाच्या मागे हिंदुत्वाच्या भावनेतून भाजपा आहे. परंतु, प्रतिष्ठा व अहंकारापोटी हा निर्णय होत नव्हता. मात्र मी या निर्णयाचं मी स्वागत करतो.” असं म्हणत प्रविण दरेकर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत; परंतु राज्य सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण. @CMOMaharashtra pic.twitter.com/2sVQe2KrRa
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव लय भारी- अशोक चव्हाण
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार- प्रवीण दरेकर
“लवकरच ट्रेलर रिलीज करू, मनात आणलं तर भाजप रिकामी होईल”