कोल्हापूर : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारला तामिळनाडू सरकारप्रमाणे याचिका घटनापीठाकडे जाण्यापूर्वी मराठा आरक्षणावरील स्थगिती का उठवता आली नाही, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, तामिळनाडूमध्येही आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. हे प्रकरणही घटनापीठासमोर सुनावणीसाठी आहे. तर केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या 10 टक्के आर्थिक मागास आरक्षणाचे प्रकरणाचीही घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. मात्र, या दोन्ही आरक्षणांवर स्थगिती नसल्यामुळे संबंधितांना त्याच्या सवलती मिळत आहेत. मग महाराष्ट्र सरकारला ही गोष्ट का जमली नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सरकारला केला.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल”
“मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली”
“केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण”
“नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील”