Home महाराष्ट्र हाथरस घटनेवर भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?- इम्तियाज जलील

हाथरस घटनेवर भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?- इम्तियाज जलील

औरंगाबाद : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर देशभरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादमध्ये उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पीडितेला एमआयएमच्या वतीनं श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी क्रांती चाैकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल पेटवून श्रद्धांजली दिली. याचदरम्यान, इम्तियाज जलील यांनी पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हे गुंडाराज आहे, असं म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावलं पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राहुल गांधींच्या कॉलरपर्यंत हात जात आहे म्हणजे पोलिसांचा नंगा नाच आहे. सर्व सिस्टम हे रिमोट कंट्रोलवर सुरू आहे. योगी आदित्यनाथला बाहेर काढले पाहिजे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हाथरस घटनेतील चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

“सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच; अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका