मुंबई : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
जेंव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेंव्हा का नामकरण केलं नाही?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि शिवसेनेला केला आहे. तसेच सत्ता होती तेंव्हा यांना कुणी रोखलं होतं? आज कसलं राजकारण करत आहात? असा प्रश्न करत राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा आणि जनतेची फसवणूक करायची, हेच चालत आलं आहे. पण संभाजीनगरची जनता हुशार आहे. ती योग्य निर्णय घेईल आणि शिवसेना-भाजपचा योग्य समाचार घेईल, असा टोलाही राज ठाकरेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी-
अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता
अमित शहांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं- नारायण राणे
“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात”
बाळासाहेबांनी ज्यांचा सन्मान केला त्यांच्यावर शिंतोडे उडवून शिवसेनेचा महाराष्ट्रद्रोह- आशिष शेलार