Home महाराष्ट्र “2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प...

“2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प का?”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे, असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. यावर मुंबई काँग्रसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईबद्दल भाजप नेत्याचं हे वक्तव्य आता तुम्हाला दिसत नाही का, हेच तुमचं मुंबई अन् महाराष्ट्राबद्दलचं प्रेम का. मी कडक शब्दात या नेत्यांचा निषेध करतो, असं म्हणत भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या 2 टक्क्याची अभिनेत्री कंगणा रणाैतच्या समर्थनार्थ भाजप नेते आणि कार्यकर्ते उतरले होते. आता, कंगणाला झाशीची राणी संबोधणाऱ्या भाजपच्या चमच्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष्मण सवदी यांच्याबद्दल बोलावं, आता गप्प का? असा प्रश्न भाई जगताप यांनी भाजपला केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?”

भर रस्त्यात शिवसैनिकांची पिस्तुल दाखवून दादागिरी?; इम्तियाज जलीलांनी व्हिडिओ केला ट्विट

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल- प्रवीण दरेकर

अखेर अण्णा हजारेंचा हट्ट मागे! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं