आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच येत्या 20 तारखेला 10 जागांसाठी 11 जणांमध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. मात्र पराभव कोणाचा होणार, याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणामध्ये जिंकेपर्यंत प्रत्येकानं जिंकण्याचा दावा करायचा असतो. घोडेमैदान लांब नाहीये. 20 तारखेला सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल, साडेसातपर्यंत कल स्पष्ट होईल. यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडेल, भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा दावा चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “मेहबूब शेख बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; पिडीतेची चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल”
दरम्यान, आता ही विकेट नेमकी कोणाची असेल, हे त्यांच्यातील आपापसातील बेबनाव ठरवेल, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात, ते आम्हांलाच मत देतील- बच्चू कडू
“मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली अनोळखी कार, अपघात थोडक्यात वाचला, ठाकरे स्वत: चालवत होते गाडी”
‘शिवसेना उमेदवाराला मत द्या, अन्…; शिवसेनेकडून अपक्ष आमदाराला ऑफर?