“राष्ट्रवादी कुणाची?; शरद पवारांची की अजित पवारांची?; निवडणूक आयोगात नेमकं काय घडलं?”

0
199

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षावर दावा सांगितला आहे. ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष बदलल्याची माहितीही अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे.

अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळी देखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतली. अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार आहे. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करुन निवडणूक याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

दरम्यान, अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरुन आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केलाय. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे, असा युक्तिवात अजित पवार गटाने यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार – प्रकाश आंबेडकर

अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

“जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज, याेग्य वेळी ते करेक्ट कार्यक्रम करतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here