मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.
आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे. दिवसभर शेतात राबणारा शेतकरी आमचा मायबाप आहे. दिवसभर अखंड मेहनत करणारा कामगार आमचा मायबाप आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच त्यांची जर कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्या फायद्यासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दिल्लीत कोणाचा बाप बसला आहे याचा, तर ते मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या वारसदारांची चिंता तुम्ही करू नये, जे विचारांनी स्पष्ट, सरळ आणि खरे असतात, त्यांचे वैचारिक वारसदार हे नेहमी तयारच असतात. तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती.
आम्ही शेतकरी,कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो,आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत.शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ.दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, तुम्हीसुद्धा पाहिलंय! @shindespeaks pic.twitter.com/rbCTGLSlbu
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल
मुंबई दरवर्षी कशी तुंबते?; नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना पत्र
पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळन 4 जणांचा मृत्यू