आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर “सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार अमोले कोल्हे यांनी दिली आहे.
हे ही वाचा : रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक वर्षांपासून कोर्टात आणि संसदेत बैलगाडा शर्यत सुरु करावी म्हणून प्रयत्न करणारे शिवजीराव आढळराव यांनीही प्रतिक्रीया देत कोल्हेंना नाव न घेता टोला लगावला आहे.
2014 साली शर्यत बंद झाली होती. 7 वर्ष ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय कानावर आला, कानावर विश्वास बसत नाहीये असं मत आढळराव पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे देखील आभार मानले आहेत.
बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली खरी पण याचं श्रेय जनतेने ठरवावं, श्रेय घ्यायला बाकीचे पुढे येतील पण मी मागे राहणार आहे, हे शेतकऱ्यांचं श्रेय आहे, राज्य शासनाचं हे खरं श्रेय आहे, असं शिवजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”
“राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”
मनसेला आणखी एक धक्का?; ‘या’ मोठ्या नेत्याची शिवसेना नेत्यासोबक गुप्त बैठक; चर्चांना उधाण