सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि माजी खासदार नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरव टीका करत असतात. यावरुन शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपक केसरकर यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
नारायण राणे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कधीही भरीव निधी आणता आला नाही. त्यांना साधं सिंधुदुर्गाचं नेतृत्व करता आलं नाही आणि ते आज उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी नेतृत्वावर टीका करत आहेत, असं दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कम्पॅरिझनमधेसुद्धा तुम्ही टिकू शकत नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा फक्त 80 कोटी रूपये आणत होता. माञ, मी साधा राज्यमंत्री असताना अडीचशे अडीचशे कोटी रूपये जिल्हा नियोजन साठी आणले. मग कुठे आहे तुमची शक्ती? त्याकाळी जे कोकणात रस्ते झाले ते सुद्धा सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणले मग तुम्ही पुर्ण केलेलं एक तरी काम दाखवा, असंही दिपक केसरकर म्हणाले.
केवळ माध्यमांना वेगवेगळ्या मुलाखती द्यायच्या आणि आपण कोणीतरी मोठे आहोत आपण काहीतरी मोठा विकास केला असे भासवायचे, अशी टीकाही केसरकर यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
“सांगलीतील भिलवडीमध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार”
मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू- उर्मिला मातोंडकर
कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे