आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 24 वा वर्धापन दिन होता. या दिनाचं औचित्य साधत शरद पवारांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह विविध नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या. शरद पवारांनी स्वत: याबाबत घोषणा केली.
या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण असणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने या दोघांपैकी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून आता खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “आनंद दीघेंच्या मृत्यूबाबत, ठाकरे गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप, म्हणाले. …ते शिंदेंचं कारस्थान…”
“अध्यक्ष पदाची जागा अजून रिक्त झालेली नाही. ही जागा जेव्हा रिक्त होईल, तेव्हा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल विचार केला जाईल”, असं स्पष्ट विधान, शरद पवारांनी यावेळी केलं. त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी याच दोघांपैकी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष असेल, या चर्चांना शरद पवारांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“क्षुल्लक कारणावरून, शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा…; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”
धमकी प्रकरणावर आता खुद्द, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…