“कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले

0
539

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन विरोधकांना टोला लगावलाय.

कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावलाय.

आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो,” असं अजित पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ती सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्‍याच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता.

महत्वाच्या घडामोडी-

“मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये”

नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे हे अजित पवारांनी विसरू नये- निलेश राणे

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू- विश्वास नांगरे पाटील

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे- उच्च न्यायालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here