कोण अमृता फडणवीस?, ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था झालीये- किशोरी पेडणेकर

0
472

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधात राज्य सरकारने सुट दिलेली नाही. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पुण्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 4 टक्के असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. यावर मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना यावेळी लगावला. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा- अमृता फडणवीस

“अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात; जयंत पाटलांकडून हाॅकी संघाला हटके शुभेच्छा”

” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय”

जिथं सत्ता नाही, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here